महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेअर बाजार १५० अंशाने वधारला; जागतिक सकारात्मक स्थितीचा परिणाम - Live Share Market

मुंबई शेअर बाजार सकाळच्या सत्रात १६१.८५ अंशाने वधारून ४१,३२५.६१ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ५७.२० अंशाने वधारून १२,१८४.२५ वर पोहोचला.

Bombay Share Market
मुंबई शेअर बाजार

By

Published : Dec 27, 2019, 12:19 PM IST

मुंबई- शेअर बाजार खुला होताना निर्देशांक १५० अंशाने वधारला. रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय आणि एचडीएफसी ट्विन्सचे शेअर वधारल्याने शेअर बाजार निर्देशांक वधारला. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सकारात्मक स्थिती असल्यानेही शेअर बाजार वधारण्यास मदत झाली आहे.


मुंबई शेअर बाजार सकाळच्या सत्रात १६१.८५ अंशाने वधारून ४१,३२५.६१ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ५७.२० अंशाने वधारून १२,१८४.२५ वर पोहोचला.

हेही वाचा-खनिज तेलाच्या दराचा गेल्या तीन महिन्यातील उच्चांक; प्रति बॅरल ६७ डॉलर!

या बँकांचे वधारले-घसरले शेअर
स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर २.१४ टक्क्यांनी वधारले. त्यापाठोपाठ पॉवरग्रीड, अॅक्सिस बँक, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती आणि एचटीएफसी ट्विन्सचे शेअर वधारले. टीसीएसचे सर्वाधिक ०.६८ टक्क्यांनी शेअर घसरले. टाटा स्टील, एचयूएल, एचसीएल टेक, बजाज ऑटो आणि टेक महिंद्राचे शेअर घसरले.

हेही वाचा-थकबाकी द्या, टिकीट घ्या; एअर इंडियाची सरकारी संस्थांना तंंबी


मागील सत्रात शेअर बाजार २९७.५० अंशात घसरण होवून निर्देशांक ४१,१६३.७६ वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक ०.७१ अंशाने वधारून १२,१२६.५५ वर स्थिरावला होता. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी गुरुवारी ५०४.१३ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली होती. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी १२०.४६ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली होती. अमेरिका आणि चीनमधील व्यापारी तणाव कमी होत असल्याने जगभरातील शेअर बाजाराचे निर्देशांक वधारत असल्याचे शेअर बाजार विश्लेषकांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details