महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

शेअर बाजार ३७१ अंशांनी वधारला; 'हे' आहे कारण - BSE news

इंडसइंड बँकेचे सर्वाधिक १५ टक्क्यापर्यंत शेअर वधारले आहेत. त्यापाठोपाठ बजाज फायनान्स, एचडीएफसी, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एम अँड एम आणि एसबीआयचे शेअर वधारले आहेत.

शेअर बाजार
शेअर बाजार

By

Published : Apr 28, 2020, 4:57 PM IST

मुंबई - शेअर बाजार सलग दुसऱ्या सत्रात वधारून बंद झाला आहे. मुंबई शेअर बाजार ३७१.४४ अंशांनी वधारून ३२,११४.५२ वर स्थिरावला. केंद्र सरकार दुसरे आर्थिक पॅकेज जाहीर करण्याच्या आशेने वित्तीय संस्थांच्या शेअरची मोठी खरेदी झाली. त्याचा परिणाम म्हणून शेअर बाजार निर्देशांक वधारला.

निफ्टीचा निर्देशांक ९८.६० अंशांनी वधारून ९,३८०.९० वर स्थिरावला.

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर

इंडसइंड बँकेचे सर्वाधिक १५ टक्क्यापर्यंत शेअर वधारले आहेत. त्यापाठोपाठ बजाज फायनान्स, एचडीएफसी, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एम अँड एम आणि एसबीआयचे शेअर वधारले आहेत. सन फार्मा, नेस्ले इंडिया, एनटीपीसी, एचसीएल टेक आणि बजाज ऑटोचे शेअर घसरले आहेत.

हेही वाचा-आयसीएमआरने टेस्ट किट परत करण्याच्या निर्णयावर चीनने 'ही' दिली प्रतिक्रिया

म्युच्युअल फंडाच्या चलन तरलतेसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने ५० हजार कोटी रुपये उपलब्ध केले आहेत. अशा स्थितीत केंद्र सरकार दुसरे आर्थिक पॅकेज जाहीर करेल, अशी शेअर बाजार गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे.

हेही वाचा-थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले 'मास्क'; जळगावातील विद्यार्थ्यांचा अविष्कार

ABOUT THE AUTHOR

...view details