मुंबई- गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या निर्देशांकाचा विक्रम आजही दिसून आला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर २२२ अंशाने वधारून ५१,५३१.५१ वर स्थिरावला. रिलायन्ससारख्या मोठ्या कंपन्यांचे वधारलेले शेअर आणि जागतिक बाजारातील सकारात्मक स्थितीने शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला आहे.
मुंबई शेअर बाजारापाठोपाठ निफ्टीचाही निर्देशांक वधारला आहे. निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर ६६.८० अंशाने वधारून १५, १७३.३० वर स्थिरावला.
हेही वाचा-सोने किंचित महाग; चांदीच्या किमतीत प्रति किलो ४५४ रुपयांची वाढ
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वाधिक ४ टक्क्यांनी शेअर वधारले आहेत. त्यापाठोपाठ सन फार्मा, पॉवरग्रीड, बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया आणि एचसीएल टेकचे वधारले आहेत. तर टायटन, एल अँड टी, ओएनजीसी, एचडीएफसी बँक आणि आयटीसीचे शेअर घसरले आहेत.
हेही वाचा-अर्थसंकल्पात गरिबांसह बेरोजगारांकडे दुर्लक्ष- पी. चिदंबरम यांची राज्यसभेत टीका
दिवसाखेर रिलायन्स इंडस्ट्रीजसह इतर कंपन्यांच्या शेअरचे दर वधारले. त्यामुळे शेअर बाजाराचा निर्देशांक उंचावण्यास मदत झाल्याचे रिलायन्स सिक्युरिटीजचे प्रमुख रणनीतीकार विनोद मोदी यांनी सांगितले. अर्थसंकल्पापासून शेअर बाजाराचा निर्देशांक वधारत आहे. सध्या, शेअर बाजाराची स्थिती थकवा आल्यासारखी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ०.६७ टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल ६१.०६ डॉलर आहेत.