मुंबई - शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात ७० अंशाने घसरला. बँकिंग आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाल्याने शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाली.
मुंबई शेअर बाजार निर्देशांक ७३.३८ अंशाने घसरून ४०,३७१.७७ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक २६.१० अंशाने घसरून ११,८९५.४० वर पोहोचला. सकाळच्या सत्रातील घसरणीचा सर्वात अधिक १.२८ टक्के बजाज फायनान्सला फटका बसला. त्यापाठोपाठ एचयूएल, आयटीसी, एसबीआय, कोटक महिंद्रा बँक, टेक महिंद्रा, टीसीएस आणि अॅक्सिस बँकेच्या शेअरमध्ये घसरण झाली.