मुंबई -शेअर बाजारात दिवसाखेर मोठी पडझड झाली आहे. दिवसाखेर मुंबई शेअर बाजार निर्देशांकात १,९३९.२ अंशाने पडझड झाली आहे. तर निफ्टीच्या निर्देशांकात ५६८.२० अंशांची घससरण झाली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर १,९३९.३२ अंशाने घसरून ४९,०९९.९९ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ५६८.२० अंशाने घसरून १४,५२९.१५ वर स्थिरावला. मुंबई शेअर बाजार खुला होताना निर्देशांकात ९२७.२१ अंशाने घसरण झाली होती. त्यानंतरही निर्देशांक पडझड सुरू राहिली आहे. शेअर बाजाराच्या घसरणीत सर्वाधित बँकिंग आणि वित्तीय संस्थांच्या शेअरला फटका बसला आहे.
हेही वाचा-अर्थव्यवस्थेचा विकास होताना उद्योगांसाठी वित्तपुरवठा वाढविण्याची गरज
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
ओएनजीसीचे सर्वाधिक सुमारे ६.५० टक्क्यांनी शेअर घसरले आहेत. त्यापाठोपाठ एम अँड एम, बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक, कोटक बँक, पॉवर ग्रीड, एचडीएफसी बजाज फायनान्स आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर घसरले आहेत. क्षेत्रनिहाय निर्देशांकात बँकिंगच्या निर्देशांकात सर्वात मोठी ४.८ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. वित्तीय कंपन्यांचे निर्देशांक ४.९ टक्क्यांनी तर दूरसंचार कंपन्यांचे निर्देशांक ३.८५ टक्क्यांनी घसरले आहेत.
हेही वाचा-कच्च्या तेलाच्या उत्पादक देशांनी किमती वाढविल्याने पेट्रोल-डिझेल महाग
- रोख्यांमधून अधिक परतावा मिळत असल्याने गुंतवणुकदारांचे जोखीम असलेल्या शेअरमधील स्वारस्य कमी झाल्याचे मत शेअर बाजार विश्लेषकांनी व्यक्त केले.
- जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर १.१६ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ६५.३४ डॉलर आहेत.
- विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भांडवली बाजारामधून गुरुवारी १८८.०८ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली होती.