मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांक किरकोळ ८६ अंशाने वधारून बाजार बंद झाला. आरबीआयने रेपो दर जाहीर केल्यानंतर बाजारातील तेजी काहीअंशी कमी झाल्याचे दिसून आले आहे.
शेअर बाजाराचा निर्देशांक ८६ अंशाने वधारून बंद, निफ्टी ११, ९०० हून कमी - शेअर बाजार
चालू आठवड्यात शेअर बाजाराचा निर्देशांक एकूण ९८.३० अंशाने घसरला आहे. तर निफ्टीच्या निर्देशांकात एकूण ५२.१५ अंशाची घसरण झाली आहे.
दिवसभरात शेअर बाजाराचा निर्देशांक ४०० अंशाने वाढला होता. निर्देशांक स्थिर होत अखेर ८६.१८ अंशाने वधारून ३९,६१५.९० वर पोहोचला. शेअर बाजाराचा निर्देशांक हा सर्वात अधिक ३९,७०३.१० तर सर्वात कमी ३९,२७९.४७ एवढा होता. निफ्टीचा निर्देशांक २६.९० अंशाने वाढून ११,८७०.६५ वर पोहोचला. चालू आठवड्यात शेअर बाजाराचा निर्देशांक एकूण ९८.३० अंशाने घसरला आहे. तर निफ्टीच्या निर्देशांकात एकूण ५२.१५ अंशाची घसरण झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर वधारले-घसरले
इंडुसलँड बँक, बजाज फायनान्स, एम अँड एम, एसबीआय, आयसीआयसी बँक आणि वेदांत या कंपन्यांचे शेअर १.९० टक्क्यांनी वधारले आहेत. तर येस बँक, पॉवरग्रीड, सन फार्मा, कोल इंडिया, बजाज ऑटो, ओएनजीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर हे २.३७ टक्क्यापर्यंत घसरले आहेत. रुपयाची डॉलरच्या तुलनेत ६९.४८ अंशाची घसरण झाली आहे.