मुंबई- शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर २८० अंशाने वधारला आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर आज वधारले आहेत.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर २८०.१५ अंशाने वधारून ५०,०५१.४४ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ७८.३५ अंशाने वधारून १४,८१४.७५ वर स्थिरावला.
हेही वाचा-मारुती सुझुकीकडून वर्षभरातच दुसऱ्यांदा वाहनांच्या किमतीत वाढ
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर-
अल्ट्राटेक सिमेंटचे सर्वाधिक सुमारे ३ टक्क्यांनी शेअर वधारले आहेत. त्यापाठोपाठ इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, टायटन, अॅक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि मारुतीचे शेअर वधारले आहेत. तर ओएनजीसी, पॉवरग्रीड, आयटीसी, एनटीपीसी, एम अँड एम आणि एचडीएफसीचे शेअर घसरले आहेत.
हेही वाचा-कर्जफेडीवरील मुदतवाढीला ३१ ऑगस्ट २०२० पेक्षा जास्त वाढ नाही -सर्वोच्च न्यायालय
वित्तीय कंपन्यांचे शेअर वधारल्याने जागतिक बाजारात नकारात्मक स्थिती असूनही देशातील शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला आहे. सर्वोच्च न्यायालयाने चक्रवाढ व्याज माफीचा निर्णय सर्वांसाठी लागू करण्याचा पुनरुच्चार केला आहे. मात्र, त्याचा अतिरिक्त भार कोणी सहन करावा, याबाबत संदिग्धता असल्याचे रिलायन्स सिक्युरिटीजचे प्रमुख रणनीतीकार विनोद मोदी यांनी सांगितले.
दरम्यान, जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ३.५३ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ६२.३४ डॉलर आहेत.