मुंबई- शेअर बाजार निर्देशांक १८५ अंशाने वधारून ४०,४६९.७० वर स्थिरावला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर हे ३.५९ टक्क्यांनी वधारले. व्होडाफोन आयडिया आणि एअरटेलचे शेअर वधारले.
निफ्टीचा निर्देशांक ५५.६० अंशाने वधारून ११,९४०.१० वर स्थिरावला. निफ्टीमधील ५० कंपन्यांच्या शेअरपैकी २६ कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. तर २४ कंपन्यांचे शेअर हे वधारले. दूरसंचार कंपनी आणि सरकारी बँकांच्या शेअरमध्ये चांगली तेजी दिसून आली.
निफ्टीत भारती एअरटेलचे शेअर हे ८.६६ टक्क्यांनी वधारले. व्होडाफोनचे शेअर हे ३८.२० टक्क्यांनी वधारले. केंद्र सरकार आर्थिक संकटात सापडलेल्या दूरसंचार कंपन्यांना दिलासा देण्यावर विचार करत आहे. यामुळे दूरसंचार कंपन्यांचे शेअर वधारले आहेत.
हेही वाचा-व्यापाऱ्यांकडून १ हजार टन कांदा आयात; महिनाअखेर देशात होणार उपलब्ध
अत्यंत निराशेतून उत्साहाने खरेदी असे चित्र दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये दिसून आल्याचे ट्रेडिंगबेल्सचे वरिष्ठ विश्लेषक संतोष मीना यांनी सांगितले. विशेषत: हे चित्र व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलमध्ये दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने एजीआरवर दिलेल्या निकालानंतर दूरसंचार कंपन्यांना मोठा तोटा झाला होता. त्यानंतर दलाल स्ट्रीटवरील प्रत्येकजण चिंतेत होता. मात्र, हे वाईट स्थिती संपल्याप्रमामे बाजारात दिसून आल्याचेही संतोष मीना यांनी सांगितले.
हेही वाचा-'रिलायन्स'चा भांडवली मूल्यात नवा विक्रम; गाठला ९.५ लाख कोटींचा टप्पा
निफ्टीमधील पीएसयू निर्देशांक ४ टक्क्यांनी वधारला. ओरियन्टल बँक ऑफ कॉमर्सचे शेअर हे २० टक्के, सिंडिकेटचे शेअर १३ टक्क्यांनी वधारले. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे शेअर ७ टक्क्यांनी वधारले. पीएनबी आणि एसबीआयचे शेअर हे १ ते ३ टक्क्यांनी वधारले.