मुंबई- शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात २०० अंशाने घसरला. विदेशी गुंतवणुकदार संस्थांनी निधी काढून घेतल्याने हा परिणाम झाला.
सकाळच्या सत्रात शेअर बाजार निर्देशांक २०१.०४ अंशाने घसरून ३८,६९६.४२ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ६६.७५ अंशाने घसरून ११,५३०.१५ वर पोहोचला.
मागील सत्रात शेअर बाजाराचा निर्देशांक ३१८.१८ अंशाने घसरून ३८,८९७.४६ वर पोहोचला.
अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेची ३०-३१ जुलैदरम्यान पतधोरणाबाबत बैठक आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने व्याजदरात कपात देण्याचे संकेत दिले आहेत. विदेशी गुंतवणुकदार संस्थांनी गुरुवारी १ हजार ४०४.८६ कोटींच्या शेअरची विक्री केली. तर देशातील गुंतवणुकदारांनी ३२९.०५ कोटींच्या शेअरची खरेदी केली.
या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले
येस बँक, एम अँड एम, बजाज फायनान्स, टाटा मोटर्स, ओएनजीसी आणि मारुती कंपनीचे शेअर हे २.२७ टक्क्यापर्यंत घसरले. तर टाटा स्टील, टीसीएस, वेदांत, एचयूसीएल, पॉवरग्रीड, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिसचे शेअर ०.६० टक्क्यापर्यंत वधारले आहेत.
रुपया डॉलरच्या तुलनेत १८ पैशांनी वधारून ६८.७८ वर पोहोचला.