मुंबई - शेअर बाजार निर्देशांकात २०० अंशाने पडझड झाली आहे. टीसीएस, येस बँक आणि इन्फोसिसच्या शेअरमध्येही घसरण झाली आहे. विदेशी गुंतवणुकदारांनी निधी सतत काढून घेतल्याने आणि जागतिक अर्थव्यवस्थेमधील संमिश्र स्थितीने शेअर बाजारात ही पडझड झाली आहे.
शेअर बाजार निर्देशांक २०६.३३ अंशाने घसरून ३६.३५७.५५ वर पोहोचला. निफ्टीचा निर्देशांक ६४.६५ अंशाने घसरून १०,७७६ वर पोहोचला. बुधवारी शेअर बाजार निर्देशांक ८२.७९ अंशाने वधारून बंद झाला होता.
हेही वाचा-मोदी सरकारचे गिफ्ट; ११ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचे वेतन बोनस मिळणार