मुंबई -मुंबई शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात ७० अंशाने घसरला. बँकांसह वित्तीय सेवा कंपन्यांवरील शेअर विक्रीच्या दबावामुळे शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाली.
शेअर बाजार निर्देशांक ६६.६९ अंशाने घसरून ४०,७३५.४८ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक हा ३५.५५ अंशाने घसरून १२,०१२.६५ वर पोहोचला. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या तिमाही पतधोरण समितीची बैठक आजापसून सुरू होत आहे. महागाई वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सलग सहाव्यांदा आरबीआयकडून ५ डिसेंबरला रेपो दरातीतील कपात जाहीर होण्याची शक्यता आहे.