मुंबई - गुरूवारची सकाळ भारतीय शेअर बाजारासाठी ऐतिहासिक ठरली. शेअर बाजाराला सुरूवात होताच सेन्सेक्सने ऐतिहासिक विक्रमी पातळी ओलांडली. सकाळच्या सत्राच्या सुरूवातीलाच सेन्सेक्स 304 अंकांनी वधारून 50 हजार अंकांचा वर पोहोचला. सेन्सेक्सने इतिहासात प्रथमच ही विक्रमी पातळी ओलांडली आहे.
बीएसईचा ऐतिहासिक विक्रम
गेल्या काही दिवसांपासून सेन्सेक्स 50 हजारांच्या उंबरठ्यावर होता. त्यामुळं ही पातळी सेन्सेक्स कधी ओलांडणार याकडे सर्वांचे लक्ष होते. गुरूवारी सकाळी सेन्सेक्सने ही पातळी गाठली. सकाळच्या सत्रात बीएसईच्या 30 शेअरमध्ये मोठी वाढ झाली. बाजाराला सुरूवात होताच सेन्सेक्स 300 अंकांनी वधारून 50,126 अंकांवर पोहोचला.
निफ्टीनेही ओलांडला 14,700 चा टप्पा
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही सकाळी तेजीचे वातावरण होते. निफ्टीही 50 अंकांनी वधारून प्रथमच 14,730 अंकांवर पोहोचला.
हेही वाचा -जागतिक बाजारात सकारात्मक चित्र; शेअर बाजाराच्या निर्देशांकाने गाठला नवा उच्चांक