मुंबई- शेअर बाजार खुला होताना निर्देशांक १५० अंशांनी वधारला. एचडीएफसी ट्विन्स, कोटक बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर वधारले आहेत.
मुंबई शेअर बाजार खुला होताना निर्देशांक १५७.८२ अंशांनी वधारून ३०,९७६.४३ वर पोहोचला. निफ्टीचा निर्देशांक ३८.४५ अंशांनी वधारून ९,१०५ वर पोहोचला.
हेही वाचा-एमएसएमई उद्योगांना ३ लाख कोटी रुपयांचे आपत्कालीन कर्ज; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
-या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
बजाज ऑटोचे शेअर ६ टक्क्यांनी वधारले. त्यापाठोपाठ हिरोमोटोकॉर्प, कोटक बँक, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स आणि मारुतीचे शेअर वधारले आहेत. तर एनटीपीसी, ओएनजीसी, आयटीसी आणि टेक महिंद्राचे घसरले आहेत.
मुंबई शेअर बाजार निर्देशांक ६२२.४४ अंशांनी वधारून ३०,८१८.६१ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक १८७.४५ अंशांनी वधारून ९,०६६.५५ वर स्थिरावला.
हेही वाचा-'आर्थिक पॅकेजमधील सुधारणांमागे मोठा गुणाकारात्मक परिणाम साधण्याचे उद्दिष्ट'
ब्रेंट क्रूड फ्युच्युअर्समध्ये खनिज तेलाचे दर प्रति बॅरल हे ०.९२ टक्क्यांनी वधारून ३६.०८ डॉलर झाले आहेत. दरम्यान, देशामध्ये सुमारे १.१२ लाख जणांना कोरोनाची लागण आहे. तर ३ हजार ४३५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.