महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

Samsung Galaxy Note 10 संबंधी मोठा खुलासा, वाचा... - smartphone

'Samsung' चा पुढील फ्लॅगशिप डिव्हाईस 'Samsung Galaxy Note 10' मध्ये कोणतेही फिजिकल बटन असणार नाही. ही माहिती दक्षिण कोरियाई न्यूज रिपोर्ट्सच्या हवाल्याने समोर आली आहे. सध्या सॅमसंगने मिड आणि बजेट रेंजच्या स्मार्टफोन्ससाठी 'Galaxy M' आणि 'Galaxy A' सीरिजचे स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत.

सांकेतिक छायाचित्र

By

Published : Mar 28, 2019, 7:17 PM IST

टेक डेस्क - 'Samsung' चा पुढील फ्लॅगशिप डिव्हाईस 'Samsung Galaxy Note 10' मध्ये कोणतेही फिजिकल बटन असणार नाही. ही माहिती दक्षिण कोरियाई न्यूज रिपोर्ट्सच्या हवाल्याने समोर आली आहे. सध्या सॅमसंगने मिड आणि बजेट रेंजच्या स्मार्टफोन्ससाठी 'Galaxy M' आणि 'Galaxy A' सीरिजचे स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत.

मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार 'Samsung Galaxy Note 10' चा लूक आणि डिजाईन गेल्यावर्षीच्या 'Samsung Galaxy Note 9' सारखा असू शकतो. यामध्ये कोणत्याही प्रकारचे फिजिकल बटन असणार नाही, असे समजते. यामध्ये फोन स्वीच ऑन किंवा ऑफ करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पावर बटन असणार नाही. बटनविना डिव्हाईसला ऑपरेट करणे युजर्सला थोडे कठीण जाऊ शकते. रिपोर्ट्सनुसार बटनच्या जागी यामध्ये जेस्चर सेंसर किंवा टच सेंसर देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

पावर बटन व्यतिरिक्त 'Samsung Galaxy Note 10' मध्ये वॉल्यूम कंट्रोलसाठीही फिजिकल बटन नसणार. फोन क्वॉड कॅमेरा आणि पंचहोल डिस्प्लेसह येणार. 'Samsung Galaxy Note 10' या वर्षीच्या ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. सध्या कंपनीने यासंबंधी कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती दिलेली नाही. कंपनी जेव्हा फोन लाँच करेल तेव्हा यासंबंधी अधिकृत माहिती युजर्सला उपलब्ध होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details