नवी दिल्ली - पेट्रोल-डिझेलचे दर आणखी कमी झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेट्रोल प्रति लिटर १७ पैशांनी तर डिझेलचे दर प्रति लिटर १९ पैशांनी कमी झाले आहेत. जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर घसरल्याने सरकारी खनिज तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले आहेत.
दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ७४.६५ रुपये आहे. तर मुंबईत ८०.२५ रुपये, कोलकात्यात ७७.२५ रुपये आणि चेन्नईत प्रति लिटर ७७.५४ रुपये असा पेट्रोलचा दर आहे. दिल्लीत डिझेलचा दर प्रति लिटर ६७.२६ रुपये, मुंबईत ७१.२५ रुपये, कोलकात्यात ७०.२२ रुपये आणि चेन्नईत ७१.२० रुपये असा दर आहे. ही माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशन वेबसाईटने दिली आहे.