मुंबई - भांडवली मूल्यात मुकेश अंबानी यांची मालकी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने नवीन विक्रम केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे भांडवली मूल्य हे ९.५ लाख कोटी रुपयांहून अधिक झाले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एका शेअरची किंमत १ हजार ५०० रुपयांवर पोहोचली आहे. ही रिलायन्सच्या शेअरची आजवरची सर्वात मोठी किंमत आहे. शेअरची किंमत वाढल्याने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भांडवली मूल्यात वाढ झाली आहे. रिलायन्सने १८ ऑक्टोबरला भांडवली मूल्यात ९ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला होता. रिलायन्स ही देशातील सर्वाधिक भांडवली मूल्य असलेली कंपनी आहे.
असे आहे आघाडीवरील कंपन्यांचे भांडवली मूल्य -
- रिलायन्स इंडस्ट्रीज - ९.५ लाख कोटी
- एचडीएफसी बँक -६.९५ लाख कोटी
- हिंदुस्थान युनिलिव्हर - ४.४१ लाख कोटी
- एचडीएफसी लि. - ३.८३ लाख कोटी
दरम्यान, देशामधील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसीने भांडवली मूल्यात १५ नोव्हेंबरला 'मैलाचा दगड' गाठला आहे. एचडीएफसी ही ७ लाख कोटी रुपयांहून अधिक भांडवली मूल्य असलेली देशातील तिसरी कंपनी ठरली आहे.