महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

पंजाब नॅशनल बँकेला फसवणुकीनंतर दुहेरी फटका, शेअरमध्ये १० टक्क्यांची घसरण - PNB fraud

मुंबई शेअर बाजारात  सकाळी पावणे अकरा वाजता पीएनबीचे शेअर ९.५४ टक्क्यांनी घसरले.

पंजाब नॅशनल बँक

By

Published : Jul 8, 2019, 2:46 PM IST

मुंबई - भूषण पॉवर स्टील लि. (बीपीएसएल) कंपनीने पंजाब नॅशनल बँकेची सुमारे 3 हजार 805.15 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. हा फटका बसला असतानाच बँकेच्या शेअरची आज सुमारे 10 टक्क्यांची घसरण झाली.

मुंबई शेअर बाजारात सकाळी पावणे अकरा वाजता पीएनबीचे शेअर 9.54 टक्क्यांनी घसरले.


काय आहे फसवणुकीचे प्रकरण-
भूषण पॉवर अँड स्टील लिमिटेड कंपनीने 3 हजार 800 कोटींची फसवणूक केल्याचे पीएनबीने म्हटले आहे. तसा अहवालही पंजाब नॅशलन बँकेने आरबीआयला दिला आहे. फॉरेन्सीक ऑडीट करून तसेच सीबीआयने भूषण कंपनीचा तपास केला. यामध्ये कंपनी तसेच संचालकांनी बेकायदेशीर पैसे बँकिंग व्यवस्थेमधून वळविल्याचे पंजाब नॅशनल बँकेने म्हटले आहे.
भूषण कंपनीबरोबरील दावा केंद्रीय कंपनी कायदा लवादाकडे (एनसीएलटी) असल्याचे पीएनबीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. वर्षभरापूर्वी नीरव मोदी आणि त्याचा मामा चोक्सीने पंजाब नॅशनल बँकेची 14 हजार कोटींची फसवणूक केली आहे.

सीबीआयने एप्रिल 2019 मध्ये भूषण पॉवर अँड स्टील कंपनीवर बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. या कंपनीने देशातील 33 बँकांकडून 44 हजार 204 कोटींचे कर्ज घेतले आहे. तर कोट्यवधींचे बँकांचे कर्ज थकविले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details