नवी दिल्ली - कोरोना संकटाच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, अधिकाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करण्याची रणनीती आखणे, तसेच स्थानिक गुंतवणुकींना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक सर्वसमावेशक बैठक घेतली.
कोरोना : गुंतवणूक आणि आर्थिक धोरणांवर पंतप्रधानांची महत्त्वपूर्ण बैठक
या बैठकीत भारतात जलद गुंतवणूक आणण्यासाठी आणि भारतीय अंतर्गत क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध धोरणांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत 'प्लग अॅण्ड प्ले बिझिनेस इन्फ्रास्ट्रक्चर' (भारतात आधीपासून सुरू असलेल्या विविध व्यवसायामध्ये आवश्यकतेनुसार गुंतवणूक किंवा अर्थ पुरवठा) अधिक विकसित करण्याविषयी चर्चा झाली. सध्या देशात असलेल्या औद्योगिक जमिनी, भूखंड किंवा मालमत्तांमध्ये 'प्लग अॅण्ड प्ले' गुंतवणूकीसाठी आवश्यक आर्थिक आधार पुरवण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी योजना विकसित करण्याविषयी ही चर्चा झाली.
या बैठकीत भारतात जलद गुंतवणूक आणण्यासाठी आणि भारतीय अंतर्गत क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध धोरणांवर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान मोदींनी सर्व संबंधितांना गुंतवणूकदारांना मदत होईल यासाठी अधिक सक्रिय दृष्टिकोन ठेवावा, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात आणि वेळोवेळी सर्व आवश्यक केंद्र व राज्य मंजुरी मिळविण्यात त्यांना मदत करावी असे निर्देश दिले आहेत.