महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात; जाणून घ्या आजचे दर - पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात

आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये तब्बल ३० टक्के घसरण झाली आहे. त्यामुळे बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले आहेत.

Petrol, diesel prices see big cut today
Petrol, diesel prices see big cut today

By

Published : Mar 9, 2020, 12:08 PM IST

नवी दिल्ली -आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये तब्बल ३० टक्के घसरण झाली आहे. त्यामुळे बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले आहेत. पेट्रोलचे दर प्रति लिटर २४ पैशांनी कमी झाले आहेत. तर डिझेलचे दर प्रति लिटर २६ पैशांनी कमी झाले आहेत.पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग चौथ्या दिवशी कमी झाले आहेत.

दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ७०.५९ रुपये आहे. मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ७६.२९ रुपये आहे. दिल्लीत डिझेलचा दर प्रति लिटर ६३.२६ रुपये आहे. तर मुंबईमध्ये प्रति लिटर ६६.२४ रुपये आहे. ही माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशन वेबसाईटने दिली आहे. आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील किंमतींनुसार पेंट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये रोज बदल होत असतात.

देशातील पेट्रोल-डिझेलचे दर हे जागतिक बाजारपेठेतील खनिज तेलाच्या दरावर अवलंबून असतात. तसेच रुपया-डॉलरमधील विनिमय दराचाही पेट्रोल-डिझेलच्या दरावर परिणाम होतो. देशात लागणाऱ्या खनिज तेलापैकी ८० टक्के तेलइंधन भारतात आयात करण्यात येते.

ABOUT THE AUTHOR

...view details