नवी दिल्ली- काही दिवस दर स्थिर राहिल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे आज दर वाढले आहेत. देशातील मोठ्या शहरात पेट्रोलचे दर ५ ते ६ पैशांनी वाढले आहेत. तर डिझेलचे दर १० ते ११ पैशांनी वाढले आहेत.
दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर ७४.६८ रुपये झाला आहे. बुधवारी दिल्लीत पेट्रोल हे ७४.६३ रुपये होता. तर बुधवारी डिझेल हे प्रति लिटर ६६.९९ रुपये होते. गुरुवारी डिझेल हे प्रति लिटर ६७.०९ रुपये आहे.
हेही वाचा-....तर पेट्रोलसह डिझेलच्या किमती भडकणार
मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ८०.३४ रुपये, चेन्नईत ७७.६४ रुपये आणि कोलकातामध्ये ७७.३४ रुपये आहे. मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर ७०.३९ रुपये, चेन्नई ७०.९३ रुपये तर कोलकातामध्ये ६९.५० रुपये आहे. सरकारी खनिज तेल कंपन्यांकडून दररोज किमतीचा आढावा घेतला जातो. आंततराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलचे दर निश्चित केले जातात.
हेही वाचा-सलग तिसऱ्या दिवशी दरवाढ; डिझेल एकूण ५० पैशांनी महाग
जर खनिज तेल विपणन कंपन्यांनी प्रिमिअम पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीचा केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाला प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव सरकारने मंजूर केला तर प्रिमिअम पेट्रोल हे प्रति लिटर ०.८० रुपयाने वाढणार आहे. तर डिझेल प्रति लिटर १.५० रुपयाने वाढणार आहे. हे वाढीव शुल्क येत्या पाच वर्षासाठी लागू होईल.