नवी दिल्ली - जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाचे (क्रूड ऑईल) दर घसरल्यानंतर पेट्रोल-डिझेलचे दरही आज कमी झाले आहेत. पेट्रोलचा दर प्रति लिटर १५ पैशांनी तर डिझेलचा दर प्रति लिटर १४ पैशांनी उतरले आहेत.
डिझेलचा दर १४ पैशांनी कमी होवून दिल्लीत प्रति लिटर ६८.९२ रुपये आहे. मुंबईत डिझेल प्रति लिटर ७१.२९ रुपये, कोलकाता आणि चेन्नईत ७२.८३ रुपये आहे. पेट्रोल-डिझेलचे दर बुधवारी स्थिर राहिले होते. दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ७५.५५ रुपये, मुंबईत ८१.१४ रुपये, कोलकात्यात ७८.२३ रुपये आणि चेन्नईत ७८.४९ रुपये आहे. पेट्रोल-डिझेलच्या दराची आकडेवारी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.
हेही वाचा-भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरण समितीमध्ये केला 'हा' मोठा फेरबदल