महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजही वाढ, जाणून घ्या काय आहेत दर - इंधन दर वाढ

देशातील अनेक शहरांमध्ये किंमती पेट्रोलचे दर 106 रुपयांच्या पुढे गेले आहेत. तर मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 106 रुपये आहेत. गेल्या 4 मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सतत वाढ होत आहे. दिल्लीमध्ये प्रेटोलचे भाव 100.91 तर डिझेलचा दर 89.88 वर पोहचला आहे.

petrol
पेट्रोल

By

Published : Jul 10, 2021, 9:49 AM IST

नवी दिल्ली -आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत. आज डिझेलच्या दरात 26 पैशांची वाढ झाली आहे, तर पेट्रोलच्या दरात 35 पैशांची वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये प्रेटोलचे भाव 100.91 तर डिझेलचा दर 89.88 वर पोहचला आहे.

गेल्या दीड महिन्यांपासून इंधन दरात सातत्याने वाढ झाल्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी पातळीवर आहेत. याशिवाय देशातील अनेक शहरांमध्ये किंमती पेट्रोलचे दर 106 रुपयांच्या पुढे गेले आहेत. तर मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 106 रुपये आहेत. गेल्या 4 मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सतत वाढ होत आहे.

महत्वाच्या शहरांमधील पट्रोल आणि डिझेलच्या किमती -

शहर पेट्रोल डिझेल
दिल्ली 100.91 89.88
मुंबई 106.93 97.46
चेन्नई 101.67 94.39
कोलकाता 101.01 92.97
बंगळुरू 104.29 95.26
चंडीगढ 97.04 89.51
पाटणा 103.18 95.46
लखनऊ 98.01 90.27
भोपाळ 109.24 98.67
रांची 95.96 94.84

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्यूटी, डीलर कमिशन आणि इतर सर्व दर जोडल्याने इंधनाची किंमती जवळजवळ दुप्पट होते. देशाला 89 टक्के कच्चे तेल आयात केले जाते. म्हणूनच जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतीमध्ये चढ-उतार होतो. तेव्हा भारतातील तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होते. तेलाच्या किंमती वाढण्यामागे प्रामुख्याने दोन कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमती आणि केंद्र व राज्ये यांच्याकडून उच्च कर दरात वाढ. पेट्रोल आणि डिझेलवरील कराचे दर राज्यात वेगवेगळे असतात.

डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासायची -

पेट्रोल-डिझेलचे दर सकाळी 6 वाजता ते अद्यावत होतात. तुम्हाला एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दररोजचे दर तपासू शकता. इंडियन ऑईल ग्राहक आरएसपी स्पेस पेट्रोल पंपचा कोड 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर पाठवल्यास माहिती मिळवू शकतात. तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

ABOUT THE AUTHOR

...view details