नवी दिल्ली- ओपो या चिनी स्मार्टफोन कंपनीने गुरुवारी एफ श्रेणीमधील 'एफ १५' हा लाँच केला. हा स्मार्टफोन देशात १९,९९० रुपयांना उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२ जीबी रॉम आहे.
एफ १५ मध्ये मीडिया टेक पी ७० प्रोसेसर आहे. तर वेगवान चार्जिंग होणारे व्हूक (व्हीओओसी) हे फ्लॅश चार्ज ३.० कंपनीने दिले आहे. ओपो एफ १५ हा पांढरा आणि फिक्कट काळ्या रंगात उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना ओपो स्मार्टफोन अॅमेझॉन, इंडिया आणि फ्लिपकार्टसह किरकोळ विक्रीच्या दुकानामधून खरेदी करता येणार आहे.
ओपो इंडियाचे उत्पादन आणि विपणन उपाध्यक्ष सुमित वालिया म्हणाले, ग्राहकांना उच्च अनुभव देण्यासाठी सीमा ओलांडण्यावर कंपनीचा विश्वास आहे. यामध्ये केवळ मजा (फन), नवनिर्मिती, वेगच नाही तर अतुलनीय अशी दिमाखदार रचना आहे.