नवी दिल्ली - वापरलेल्या, सेंकड हँण्ड वस्तू ऑनलाईन विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या ओएलएक्सने भारतातील २५० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. कंपनीतील अंतर्गत रणनितीमध्ये बदल करत असल्याचे कारण सांगण्यात आले आहे. या कपातीमुळे नोकरीवर गंडांतर आलेले सर्वाधिक कर्मचारी विक्री आणि मदत विभागातील आहेत.
ओएलएक्सच्या प्रवक्त्याने रविवारी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “कंपनीच्या धोरणांचा पुनर्आढावा घेताना आम्ही गेल्या आठवड्यात काही नवीन योजना आखल्या आहेत. या निर्णयामुळे आमच्या विक्री आणि मदत विभागातील २५० कर्मचाऱ्यांची कपात करावी लागली. हा निर्णय घेणे आमच्यासाठी कठीण होते. आम्ही त्यांना सन्मानपूर्वक निरोप देणार आहोत.