महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सलग तीन दिवसाच्या घसरणीला ब्रेक; शेअर बाजारात ४११ अंशाची उसळी - Share Market news

पुढील आठवड्यात रोखे विक्री काढण्याच्या सूचनेने वित्तीय संस्थांचे शेअर वधारल्याचे जिओजीट फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर यांनी सांगितले. तर अमेरिका-चीन व्यापारी युद्धाची चिंता कमी झाल्याने जागतिक बाजारपेठेत सकारात्मक स्थिती आहे.

Bombay Share Market
मुंबई शेअर बाजार

By

Published : Dec 27, 2019, 7:12 PM IST

मुंबई - शेअर बाजारात सलग तीन दिवस सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक लागला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज १ टक्क्यांनी वधारला. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, अ‌ॅक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेचे शेअर वधारले.

शेअर बाजारातील वधारल्याचा सर्वाधिक फायदा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना झाला. सरकारी बँकांचे शेअर ३ टक्क्यांनी वधारले. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) १० वर्षे मुदतीचे १० हजार कोटी रुपयांचे शेअर खरेदी करण्याची अधिसूचना काढली आहे. तर आरबीआयने २०२० ला मुदत संपणाऱ्या १० हजार कोटी रुपये मूल्य असलेल्या रोख्यांची विक्री काढण्याचा निर्णय जाहीर केला.

मुंबई शेअर बाजार निर्देशांक

हेही वाचा-रेल्वे प्रवासाच्या तिकिटांचे दर वाढणार; व्ही. व्ही. यादव यांचे संकेत

पुढील आठवड्यात रोखे विक्री काढण्याच्या सूचनेने वित्तीय संस्थांचे शेअर वधारल्याचे जिओजीट फायनान्शियल सर्व्हिसेसचे विनोद नायर यांनी सांगितले. तर अमेरिका-चीन व्यापारी युद्धाची चिंता कमी झाल्याने जागतिक बाजारपेठेत सकारात्मक स्थिती आहे.

निफ्टी इंडेक्स

शेअर बाजार ४११.३८ अंशाने वधारून ४१,५७५.१४ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ११९.२५ अंशाने वधारून १२,२४५.८० वर स्थिरावला. अलाहाबाद बँकेचे शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांनी विशेष रस दाखविला. अलाहाबाद बँकेला नव्याने २ हजार १५३ कोटी रुपयांचे भांडवली सहाय्य करण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले. त्यामुळे अलाहाबाद बँकेचे शेअर ८ टक्क्यांनी वधारले.

हेही वाचा-जेके बँकेची जम्मू आणि काश्मीरसाठी लीड बँक म्हणून नियुक्ती -आरबीआय


जागतिक बाजारपेठ-
अमेरिका-चीनमधील करार होणार असल्याने जागतिक बाजारपेठेत सकारात्मकता आहे. अमेरिकेच्या भांडवली बाजाराने गुरुवारी विक्रमी निर्देशांक नोंदविला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details