मुंबई- शेअर बाजार निर्देशांक सकाळच्या सत्रात ५४.६१ अंशाने घसरून ४०,६१.४५ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक हा ३३.२० अंशाने घसरून ११,८०७.२५ वर पोहोचला. किरकोळ बाजारपेठेतील वाढलेली महागाई आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील नकारात्मक स्थितीने शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाली आहे.
घाऊक बाजारपेठेतील महागाईची आकडेवारी आज जाहीर होणार आहे. याकडे गुंतवणुकदारांचे लक्ष लागलेले आहे.
हेही वाचा-अमेरिकेच्या बंदीनंतरही हुवाईची चांगली कामगिरी; कर्मचाऱ्यांना देणार २०४४ कोटींचा बोनस
या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले शेअर-
भारती एअरटेल, इंडसंइंड बँक, टाटा मोटर्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, टाटा स्टील, ओएनजीसी आणि एचयूएलचे शेअरिंगचे ३.३४ टक्क्यांनी शेअर घसरले. इन्फोसिस, येस बँक, एशियन पेंट्स आणि मारुतीचे शेअर हे २.१३ टक्क्यांनी वधारले. मुंबई शेअर बाजार बुधवारी २२९.०२ अंशाने घसरून ४०,११६.०६ वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांकही ११,८४०.४५ वर स्थिरावला होता.