टेक डेस्क - लेनोव्हो कंपनी सध्या 100 MP चा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे, असे समजते. चीनची स्मार्टफोन कंपनी लेनोव्होने मोबाइल वर्ल्ड काँग्रेसच्या दरम्यान 5G कनेक्टिविटी असलेल्या स्मार्टफोन संबंधी माहिती दिली होती. यामध्ये HyperVision कॅमेरा देण्यात येईल, असे कंपनीने सांगितले होते. रिपोर्टनुसार हा फोन 'Lenovo Z6 Pro' असण्याची शक्यता आहे आणि यामध्ये १०० मेगापिक्सेल रिअर कॅमेरा असू शकतो.
'Lenovo Z6 Pro' मध्ये मिळू शकतो 100 MP कॅमेरा - 5G enabled phone
लेनोव्हो कंपनी सध्या 100 MP चा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे, असे समजते. चीनची स्मार्टफोन कंपनी लेनोव्होने मोबाइल वर्ल्ड काँग्रेसच्या दरम्यान 5G कनेक्टिविटी असलेल्या स्मार्टफोन संबंधी माहिती दिली होती. यामध्ये HyperVision कॅमेरा देण्यात येईल, असे कंपनीने सांगितले होते. रिपोर्टनुसार हा फोन 'Lenovo Z6 Pro' असण्याची शक्यता आहे आणि यामध्ये १०० मेगापिक्सेल रिअर कॅमेरा असू शकतो.
GizChina च्या एका रिपोर्टनुसार यामध्ये १ बिलियन पिक्सेल म्हणजे १०० मेगापिक्सेलचा कॅमेरा असणार. कंपनीने MWC च्या दरम्यान सांगितले होते, की यामध्ये सुपर मॅक्रो मोड्स देण्यात येतील. आताच्या काळात कंपन्या पिक्सेल बायनिंग तंत्रज्ञान स्मार्टफोनसाठी वापरत आहेत. लेनोव्होही हे तंत्रज्ञान वापरण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
सध्या मार्केटमध्ये 48 MP चे कॅमेरे ट्रेडिंगमध्ये आहेत. अमेरिकेची चिपमेकर कंपनी क्वॉल्कॉमनेही काही महिन्यांपूर्वी म्हटले होते, की १०० मेगापिक्सेलचा कॅमेरा हा प्रत्यक्षात उतरू शकतो. सध्या लेनोव्होने हे स्पष्ट केलेले नाही, की १०० मेगापिक्सेलसह कोणता स्मार्टफोन लाँच होणार. मात्र चर्चा आहे, की Z6 Pro हा स्मार्टफोन 100 MP कॅमेऱ्यासह लाँच होण्याची शक्यता आहे.