नवी दिल्ली - अक्षयतृतीयेला मोठी उलाढाल होणारी सराफ बाजारपेठ टाळेबंदीमुळे ठप्प आहे. यातून मार्ग काढत अनेक सराफांनी ग्राहकांना ऑनलाईन खरेदीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी राज्यांनी सावधगिरीची भूमिका घेत दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली नाही. व्यापारी संघटनेनेही दुकाने सुरू करू नका, असे दुकानदारांना आवाहन केले आहे. त्यामुळे देशातील सर्व सोन्याची दुकाने बंद आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे (आयबीजेए) राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता म्हणाले, की सोन्याच्या किमती आजपर्यंत सर्वाधिक आहेत. ही सराफा बाजारपेठेसाठी चांगली बातमी आहे.
हेही वाचा-सुंदर पिचाई यांना वेतनांसह मिळणारे भत्ते जगात सर्वाधिक; आकडा ऐकून व्हाल थक्क