नवी दिल्ली - जागतिक बाजारातील सकारात्मक स्थितीने शेअर बाजाराचा निर्देशांक सलग दुसऱ्या सत्रात आज वधारला आहे. त्यामुळे शेअर बाजार गुंतवणुकदारांच्या संपत्तीत दोन दिवसांमध्ये ६,०२,००१.९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर १,१२८.०८ अंशाने वधारून ५०,१३६.५८ वर स्थिरावला. शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५६८.३८ अंशाने वधारला होता. शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपन्यांचे भांडवली मूल्य आज ६,०२,००१.९ कोटी रुपयांवरून २,०४,७७,४७२.३३ कोटी रुपये झाले आहे.
जिओजीट फायनान्शियल सर्व्हिसेसचे प्रमुख विनोद नायर म्हणाले की, कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना त्याबाबतच्या चिंतेकडे गुंतवणुकदारांनी लक्ष दिले नाही. लसीकरणाने अर्थव्यवस्था सावरत असताना त्याकडे गुंतवणुकदारांनी लक्ष केंद्रित केले आहे.