महाराष्ट्र

maharashtra

‘या’ कंपनीनेही कोरोनावरील फॅविपिरावीर औषध आणले बाजारात

By

Published : Jul 29, 2020, 2:49 PM IST

हेटेरो कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीला भारतीय फॅविवीर औषधाला औषध नियंत्रण महासंचालनालयाने (डीसीजीआय) परवानगी दिली आहे. यापूर्वी कंपनीने कोरोनावरील उपचारासाठी उपुयक्त ठरणारे रेमेडेसीवीरचे कोविफॉर हे औषध विकसित केले आहे.

संग्रहित
संग्रहित

हैदराबाद– कोरोनावरील उपचाराबाबत दिलासादायक बातमी आहे. हेटेरो लॅबने फॅविपिरावीर या कोरोनावरील औषध फॅविवीर नावाने बाजारात आणले आहे.

हेटेरो कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीला भारतीय फॅविवीर औषधाला औषध नियंत्रण महासंचालनालयाने (डीसीजीआय) परवानगी दिली आहे. यापूर्वी कंपनीने कोरोनावरील उपचारासाठी उपुयक्त ठरणारे रेमेडेसीवीरचे कोविफॉर हे औषध विकसित केले आहे. हे औषध हे तोंडावाटे देण्यात येते. या औषधाचे वैद्यकीय चाचणीत सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

कोरोनाची सौम्य लक्षणे आढळलेल्या रुग्णांसाठी फॅविवीर औषध मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. या औषधामुळे रुग्णांमध्ये दिसणारी कोरोनाची सौम्य लक्षणे कमी होतात. हेटेरो कंपनीच्या फॅविवीरच्या एका गोळीची किंमत 59 रुपये आहे. या औषधाचे वितरण आणि मार्केटिंग हे हेटेरो हेल्थकेअर कंपनीकडून करण्यात येत आहे.

हे औषध आजपासून बाजारात उपलब्ध होणार आहे. तसेच रुग्णालयांमधील औषधी दुकानांमध्ये औषध उपलब्ध होणार आहे. केवळ डॉक्टरांच्या चिठ्ठीनेच औषध खरेदी करता येणार आहे.

औषधाची निर्मिती जागतिक दर्जाच्या सुविधा असलेल्या उत्पादन प्रकल्पात करण्यात येते. या औषधाच्या निर्मितीसाठी जागतिक नियामक संस्था असलेल्या युएसएफडीए आणि ईयुने परवानगी दिल्याचेही हेटेरो कंपनीने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details