नवी दिल्ली - सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा ६७९ रुपयांनी घसरून ४४,७६० रुपये आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती आणि डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याने ही घसरण झाली आहे. सोन्याचे दर मागील सत्रात प्रति तोळा ४५,४३९ रुपये होते.
चांदीच्या प्रति किलो १,८४७ रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचे दर मागील सत्रात प्रति किलो ६८,९२० रुपये होते. चांदीचे दर सध्या प्रति किलो ६७,०७३ रुपये आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल म्हणाले की, दिल्लीत २४ कॅरट सोन्याच्या दरात प्रति तोळा ६७९ रुपयांची घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य १४ पैशांनी वधारले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरून प्रति औंस १,७१९ डॉलर आहेत. तर चांदीचे दर घसरून प्रति औंस २६.०८ डॉलर आहेत.
हेही वाचा-शेअर बाजाराने गाठला पुन्हा ५०,००० चा टप्पा; आयटीचे शेअर तेजीत!