नवी दिल्ली- सोन्याचा दरात दिल्लीत प्रति तोळा 283 रुपयांची घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी मंदावल्याने हे दर घसरल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 46,853 रुपये होता. सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीच्या दरात प्रति किलो 661 रुपयांची घसरण होऊन 65,514 रुपये दर आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो 66,175 रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरून प्रति औंस 1,799 डॉलर आहे. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस 25.15 प्रति डॉलर आहेत.
हेही वाचा-GOLD PRICE सोन्यासह चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या, आजचे दर