नवी दिल्ली- सोन्याचे दर प्रति तोळा ८०० रुपयांनी वाढून भाववाढीचा उच्चांक गाठला आहे. सोन्याचा दर प्रतितोळा ३६ हजार ९७० रुपये आहे. चीन-अमेरिकेमधील व्यापारी युद्ध पुन्हा पेटले असताना विदेशी गुंतवणुकदारांनी सोने खरेदीला प्राधान्य दिले आहे. त्याचा परिणाम म्हणून सोन्याचे भाव वाढले आहेत.
सोन्याला अभूतपूर्व झळाळी, प्रति तोळा भाव ३७ हजारांच्या घरात - silver rate
डॉलरच्या तुलनेत ९९ पैशांनी घसरण होवून रुपया ७०.५९ वर पोहोचला. यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यामधील गुंतवणुकीला पसंती दिली आहे.
चांदीचे दर हे १ हजार रुपयांनी वाढून ४१ हजार प्रति किलो झाले आहेत. औद्योगिक कंपन्या आणि नाणेनिर्मिती करणाऱ्या उद्योगांकडूनही चांदीची मागणी वाढली आहे. सोन्याचे दर मे २०१३ नंतर प्रथमच एवढे वाढल्याचे ऑल इंडिया सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात अमेरिकेने चीनच्या उत्पादनांवरील आयात शुल्क १० टक्क्यांनी वाढविण्याचा इशारा दिला. त्यामुळे जागतिक आर्थिक मंचावर अनिश्चतेचे सावट निर्माण झाले आहे. डॉलरच्या तुलनेत ९९ पैशांनी घसरण होवून रुपया ७०.५९ वर पोहोचला. यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यामधील गुंतवणुकीला पसंती दिली आहे.