महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सोन्याच्या किमतीत प्रति तोळा १८५ रुपयांची वाढ - Gold latest news

चांदीचे दर प्रति किलो १,३२२ रुपयांनी वाढून ६८, १५६ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६६,८३४ रुपये होता.

सोने दर न्यूज
सोने दर न्यूज

By

Published : Dec 28, 2020, 6:44 PM IST

नवी दिल्ली - सोन्याचे दर देशात पुन्हा वाढू लागले आहेत. जागतिक बाजारातील अस्थिर स्थितीमुळे सोन्याचे दर वाढले आहेत.

सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा १८५ रुपयांनी वाढून ४९,७५७ रुपये आहेत. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४९,५७२ रुपये होता. चांदीचे दर प्रति किलो १,३२२ रुपयांनी वाढून ६८, १५६ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६६,८३४ रुपये होता.

हेही वाचा-year Ender 2020: उद्योगजगताच्या वर्षभरातील ठळक घडामोडींचा मागोवा

डॉलरचे मूल्य घसरल्याने सोन्याचे दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले. कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे चिंता वाढली आहे. काही देशांमध्ये टाळेबंदी असल्याने सोन्याचे दर वाढल्याचेही पटेल यांनी सांगितले.

हेही वाचा-टिप्स इंडस्ट्रीजचे संगीत व व्हिडिओ फेसबुकसह इन्स्टाग्रामवर वापरता येणार; दोन्ही कंपन्यांमध्ये करार

सोने व चांदीच्या भावात चढ-उतार
गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ होत जाऊन सोने ५८ हजारांपर्यंत गेले होते. तसेच चांदीदेखील ७७ हजारांच्या पुढे गेली होती. मात्र, नंतर बाजारपेठ अनलॉक होत गेली तसतसे सोने-चांदीचे भाव कमी-कमी होत गेले. विशेष म्हणजे, विजयादशमी व धनत्रयोदशीलादेखील सोने-चांदीचे भाव आणखी कमी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details