नवी दिल्ली- सोन्याचे दर नवी दिल्लीत प्रति तोळा ५२७ रुपयांनी वाढून ४८,५८९ रुपये आहेत. जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्याने देशात सोने महागल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४८,०६२ रुपये होता.
सोन्यापाठोपाठ चांदीचे दरही महागले आहेत. चांदीचा दर १,०४३ रुपयांनी वाढून ७१,७७५ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति तोळा ७०,७३२ रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर वधारून प्रति औंस १,९०८ डॉलर आहे. तर चांदीचे स्थिर राहून प्रति औंस २८.०७ डॉलर आहे.
हेही वाचा-२ लाख नगद, ५० हजारांचे दागिने घेऊन नववधुचा पोबारा, यापूर्वीही एकाला फसवले होते