नवी दिल्ली– कोरोना महामारीत अनिश्चितता असतानाही सोन्यासह चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा दर प्रति तोळा 1 हजार 492 रुपयांनी घसरून 52 हजार 819 रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातुची विक्री वाढली आहे. त्यामुळे राजधानीत सोन्याचे दर घसरल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
सोन्याचा दर मागील सत्रात प्रति तोळा 54 हजार 311 रुपये होता. चांदीचा दर प्रति किलोला 1 हजार 476 रुपयांनी घसरून 67 हजार 924 रुपये झाला आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो हा 69 हजार 400 रुपये होता.