नवी दिल्ली - सोन्याची किंमत राजधानीत प्रति तोळा (१० ग्राम) २२५ रुपयांनी वाढून ३८,७१५ रुपये झाली आहे. लग्नसराई आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे वाढलेले दर यांचा एकत्रित परिणाम झाल्याने सोन्याची किंमत वाढली आहे. सोन्याचा दर मंगळवारी प्रति तोळा ३८,४९० रुपये होता.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल म्हणाले, रुपयाचे घसरलेल्या मूल्याने सोन्याचे दर वाढले आहेत. रुपया डॉलरच्या तुलनेत आज ३० पैशांनी घसरून ७१.७७ वर पोहोचला. अमेरिका-चीनमधील व्यापार युद्ध आणि हाँगकाँगमधील राजकीय अस्थिरता या कारणांनी रुपयाची घसरण झाली आहे.
हेही वाचा-'फेसबुक पे' अमेरिकेत लाँच; जाणून घ्या, अधिक माहिती