महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सोने प्रति तोळा ११६ रुपयांनी महाग; जाणून घ्या चांदीचे दर - gold price in New Delhi

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति औंस वधारून १,७८२ डॉलर आहेत. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस २६.१३ डॉलर आहेत.

gold rate news
सोने दर न्यूज

By

Published : Jun 28, 2021, 9:22 PM IST

नवी दिल्ली - सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा ११६ रुपयांनी वाढून ४६,३३७ रुपये आहे. जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्याने चांदीचे दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे. मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४६,२२१ रुपये होता.

सोन्यापाठोपाठ चांदीचे दर वधारले आहेत. चांदीचे दर प्रति किलो १६१ रुपयांनी वाढून ६६,८५४ रुपये आहेत. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६६,८५४ रुपये होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल म्हणाले, की कोमेक्स गोल्डमधील सोन्याचे वाढलेले दर आणि रुपयाची डॉलरच्या तुलनेत झालेल्या घसरणीचा सोन्याच्या दरावर परिणाम झाला आहे.

हेही वाचा-वादाला फुटले नवे तोंड; ट्विटरने नकाशातून वगळले जम्मू काश्मीर!

आंतरराष्ट्रीय बाजारातही वाढले सोने-चांदीचे दर-

सोमवारी रुपयाचे मुल्य डॉलरच्या तुलनेत घसरून ७४.२६ डॉलर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति औंस वधारून १,७८२ डॉलर आहेत. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस २६.१३ डॉलर आहेत.

हेही वाचा-काश्मीर पोलिसांना मोठे यश! लष्कर-ए-तोयबाच्या टॉपच्या कमांडरला अटक

सोन्याच्या किमती कशा ठरतात?

झेन सिक्युरिटीजचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सतीश कनथेटी यांच्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारातील अमेरिकेच्या डॉलरचे मूल्य आणि सोन्याची किंमत यांचे व्यस्त प्रमाण असते. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे झाले तर जसे डॉलरचा दर वधारतो, तसे सोन्याच्या किमती घसरतात. तर डॉलरचे मूल्य घसरल्यानंतर सोन्याच्या किमती वाढायला लागतात. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने काही संकेत दिल्यानंतर अलीकडे सोन्याच्या किमती घसरल्याचे कानथेटी यांनी ईटीव्ही भारतला बोलताना सांगितले.

खरेदी करण्यासाठी टिप्स?

सतिश यांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत सोन्याचे दर अल्प काळासाठी आणखी कमी होण्याची शक्यता आहे. कारण, डॉलरचे मूल्य हे वाढत आहे. ज्यांना दीर्घकालीन मुदतीकरिता गुंतवणूक करण्याची आहे, त्यांनी सोन्याचे दर घसरत असताना गुंतवणूक करण्यास सुरुवात करायला हवी. ज्यांना पुरेशी गुंतवणूक करायची आहे, ते सोन्याचे दर आणखी कमी होण्याकरिता वाट पाहू शकतात.

ABOUT THE AUTHOR

...view details