नवी दिल्ली– सोन्याच्या दरात प्रति तोळा 557 रुपयांनी घसरण झाली आहे. दिल्लीत सोन्याचा दर प्रति तोळा 52 हजार 350 रुपये असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
चांदीच्या किमती प्रति किलो 1 हजार 606 रुपयांनी घसरून 66 हजार 736 रुपये झाल्या आहेत. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो हा 68 हजार 342 रुपये होता. तर सोन्याचा दर मागील सत्रात प्रति तोळा 52 हजार 907 रुपये होता. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 557 रुपयांनी घसरला आहे. रुपया डॉलरच्या तुलनेत वधारल्याने सोन्याचे दर घसरल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल यांनी सांगितले.