नवी दिल्ली - राजधानीत सोन्याच्या दरात प्रति तोळा 305 रुपयांनी घसरण झाली आहे. या घसरणीनंतर सोने प्रति तोळा 46,756 रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे घसरलेले दर आणि रुपयाचे डॉलरच्या तुलनेत वाढलेले मूल्य या कारणांनी सोन्याचे दर देशात घसरले आहेत.
मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 47,061 रुपये होता. सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीचा दर प्रति किलो 67,923 रुपयांवरून 67,810 रुपये झाला आहे. बाजार खुला होताना सकाळच्या सत्रात रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत 23 पैशांनी वधारून 74.64 रुपये आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे मूल्य प्रति औंस 1,768 डॉलरने वाढले आहे. तर चांदीचे दर स्थिर राहून प्रति औंस 25.90 डॉलर आहेत.
हेही वाचा-अजबच.. कोंबड्यांनी अंडी देणे बंद केल्यामुळे पोल्ट्री धारकांची पोलिसात तक्रार