नवी दिल्ली– सोन्याचा दर राजधानीत प्रति तोळा 640 रुपयांनी घसरून 54 हजार 269 रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरल्याने देशातही सोन्याचे दर उतरल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या, मौल्यवान धातुंचे आजचे दर
अमेरिकेच्या फेडरल ओपन मार्केट कमिटीपूर्वी डॉलर निर्देशांकावर आज डॉलर वधारला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल यांनी सांगितले.
मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 54 हजार 909 रुपये होता. विक्रीच्या दबावातून चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीचा दर प्रति किलो 3 हजार 112 रुपयांनी घसरून 69 हजार 450 रुपये झाला आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो 72 हजार 562 रुपये होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर घसरून प्रति औंस हा 1 हजार 988 डॉलर झाला आहे. तर चांदीचे दर स्थिर असून प्रति औंस 27.43 डॉलर आहेत. अमेरिकेच्या फेडरल ओपन मार्केट कमिटीपूर्वी डॉलर निर्देशांकावर आज डॉलर वधारला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपान पटेल यांनी सांगितले.