टेक डेस्क - लोकसभा निवडणुकीची (२०१९) तयारी सध्या जोरात सुरू आहे. अनेक राजकीय पक्ष आपल्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध करत आहेत. अशातच भारतीय निवडणूक आयोगाने सोशल मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरची मदत घेतली आहे. निवडणूक आयोगाचे ट्विटर हँडल@ECISVEEP जारी झाले आहे.
निवडणूक आयोग ट्विटरवर, नागरिकांना जागरुक करण्यासाठी सुरू केला प्रचार अभियान - ECISVEEP
लोकसभा निवडणुकीची (२०१९) तयारी सध्या जोरात सुरू आहे. अनेक राजकीय पक्ष आपल्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध करत आहेत. अशातच भारतीय निवडणूक आयोगाने सोशल मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरची मदत घेतली आहे. निवडणूक आयोगाचे ट्विटर हँडल @ECISVEEP जारी झाले आहे.
यापूर्वी ट्विटरने निवडणुकांसाठी इमोजी जारी केले होते. हे इमोजी १२ भाषांमध्ये उपलब्ध आहेत. निवडणूक आयोगाच्या हँडलवरुन#DeshKaMahaTyohar या हॅशटॅगसह ट्विट करण्यात येत आहेत. निवडणूक आयोगाच्या हँडलच्या डिस्क्रिप्शनवर लिहिले आहे, की भारतीय निवडणूक आयोगाचे हे हँडल लोकसभा निवडणुकांसंबंधी संबंधी लोकांना जागरुक करण्यासाठी आहे. मतदारांना समस्या असल्यास http://www.nvsp.in आणि मीडिया अपडेट्ससाठी @SpokespersonECI वर व्हिजिट करू शकतात. उल्लेखनीय म्हणजे निवडणूक आयोगाचे ट्विटरवर कोणतेही अकाउंट नव्हते. मात्र फेसबुक अकाउंट पूर्वीपासून होते.
ट्विटर इंडिया पब्लिक पॉलिसी अॅन्ड गवर्नमेंट डायरेक्टर महिमा कौल म्हणाल्या, की भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे आणि लोकसभा निवडणुकीत ट्विटर यावर फोकस करत आहे. निवडणूक आयोगाद्वारे अलीकडेच सुरू नागरिकांमध्ये त्यांचे मतदारसंघ, जबाबदाऱ्या आणि निवडणूक प्रक्रियासंबंधी जागरुकता वाढावी यासाठी प्रचार अभियान राबवण्यात येत आहेत.