मुंबई- टिव्हीच्या किमती मार्चपासून १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे टीव्ही पॅनेलची चीनमधून होणारी आयात विस्कळित झाली आहे. त्यामुळे दूरदर्शन संचांच्या किमती वाढणार आहेत.
दूरदर्शन संचापैकी ६० टक्के किंमत ही सुमारे टीव्ही पॅनेलचीच असते. हे टीव्ही पॅनेल चीनमधून आयात करण्यात येतात. चीनमधील उद्योग ठप्प झाल्याने किमान एका तिमाहीपर्यंत दूरदर्शन संचांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे.
हेही वाचा-केंद्र सरकारने राज्यांना जीएसटीच्या भरपाईपोटी दिले १९,९५० कोटी रुपये
चीनमधून आयात होणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा झाला आहे. त्यांच्या किमती २० टक्क्यांनी वाढल्याचे एसपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अवनीत सिंह मारवाह यांनी सांगितले. अशीच परिस्थिती राहिली तर दूरदर्शन संचाच्या उत्पादनाचे ३० ते ५० टक्के नुकसान होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-अमेरिकेसोबत करार करण्यास आम्हाला घाई नाही - परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
हेअर इंडियाचे अध्यक्ष इरिक ब्रॅगान्झा म्हणाले, फ्रिज आणि एसीच्या किमतीही येत्या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे. बहुतांश कंपन्या एसी आणि फ्रिजसाठी लागणारे कॉम्प्रेसर चीनमधून आयात करतात.