नवी दिल्ली- केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला संसदेमध्ये सादर करण्यात येणार आहे. या दिवशी शनिवारी असूनही मुंबई शेअर बाजार सुरू राहणार आहे. सामान्यत: मुंबई शेअर बाजाराचे कामकाज शनिवारी बंद असते.
मुंबई शेअर बाजाराचे १ फेब्रुवारीला सकाळी सव्वानऊ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत काम सुरू राहणार आहे. तर शेअर बाजार खुला होण्यापूर्वी ट्रेडिंग सकाळी नऊ ते सव्वानऊ वाजेपर्यंत राहणार आहे.
तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २८ फेब्रुवारील २०१५ ला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता. या दिवशीही शनिवार असताना मुंबई शेअर बाजार सुरू राहिला होता.