नवी दिल्ली- केंद्र सरकारने भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या खासगीकरणाची पूर्ण तयारी केली असल्याने कंपनीच्या शेअरला आज फटका बसला. मुंबई शेअर बाजारात कंपनीचे शेअर ३.५७ टक्क्यांनी घसरले आहेत.
मुंबई शेअर बाजारात बीपीसीएलचे शेअर ३.५३ टक्क्यांनी घसरून ४९७ रुपये झाले आहेत. तर निफ्टीत सरकारी कंपनीचा शेअर (पीएसयू) ३.२१ टक्क्यांनी घसरून प्रति शेअर ४९९ रुपये झाला आहे. केंद्र सरकारने बीपीसीएलच्या राष्ट्रीयकरणाचा कायदाच रद्द केला आहे. यापूर्वी केंद्र सरकारने बीपीसीएलच्या खासगीकरणाच्या प्रस्ताव तयार केला आहे. राष्ट्रीयकरण रद्द झाल्याने कंपनीची मालत्ता खासगी अथवा विदेशी कंपन्यांना विकण्यासाठी सरकारला संसदेच्या मंजुरीची आवश्यकता लागणार नाही.
केंद्र सरकार बीपीसीएलमधील ५३.३ टक्के हिस्सा विकणार आहे. बीपीसीएलचे मुंबई, कोची (केरळ), बिना (मध्यप्रदेश), नुमालीगढ(आसाम) येथे तेलशुद्धीकरण केंद्र आहेत. तर बीपीसीएलचे देशात १५ हजार ७८ पेट्रोल पंप आहेत. तर ६ हजार ४ एलपीजी वितरक आहेत.