नवी दिल्ली - जर्मनीची आलिशान कारची निर्मिती करणाऱ्या बीएमडब्ल्यूने देशात नवे मॉडेल लाँच केले आहे. हे मॉडेल मध्यम आकाराची स्पोर्ट अॅक्टिव्हटी व्हिकल (एसएव्ही) एक्स ३ एम आहे. या मॉडेलची देशात ९९.९ लाख रुपये (एक्स शोरुम) किंमत आहे.
स्पोर्ट अॅक्टिव्हटी व्हिकल हे मॉडेल उच्च दर्जाची कामगिरी करणारी कार आहे. त्यासाठी गरजांची पूर्तता करणारे तंत्रज्ञान एसएव्ही एक्स ३ एममध्ये असल्याचे बीएमडब्ल्यूने म्हटले आहे. ही कार संपूर्णपणे जर्मनीमध्ये तयार झालेली आहे. या कारच्या समावेशाने मध्यम आकाराची एसएव्ही श्रेणी आणखी बळकट झाल्याचे कंपनीचे भारतीय अध्यक्ष विक्रम पावाह यांनी म्हटले आहे.
ही आहे कारची वैशिष्ट्ये-
- नव्याने विकसित केलेले इंजिन आणि चेसिस तंत्रज्ञान या कारणांनी हे मॉडेल अद्वितीय ठरत असल्याचेही पावाह यांनी म्हटले आहे.
- कारमध्ये आलिशान आणि स्पोर्ट कारच्या वैशिष्ट्यांचा संगम असल्याचे पावाह यांनी नमूद केले आहे.
- यामध्ये सुरक्षितता आणि कार चालण्याचा सुंदर अनुभव आदींचा समावेश आहे.
- नवीन एसएव्हीमध्ये जागतिक दर्जाची वैशिष्ट्ये असल्याने ही इतर मॉडेलपेक्षा वेगळी ठरत असल्याचा दावा पावाह यांनी केला आहे.
कारला आहे भन्नाट वेग-
बीएमडब्ल्यी एक्स ३ एममध्ये सहा पेट्रोल सिंलिंडरचे इंजिन आहेत. त्यामुळे ४८० अश्वशक्तीची (हॉर्सपॉवर) उर्जा निर्माण होते. ही कार प्रति तासात सर्वाधिक वेगाने चालविल्यास २५० किमी अंतर कापू शकते, असे कंपनीने म्हटले आहे.