मुंबई- शेअर बाजाराने निर्देशांक 228 अंश वधारल्याने बाजाराने विक्रमी उच्चांक गाठला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर वधारल्याने शेअर बाजारात तेजी दिसून आली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 228.46 अंशाने वधारून 52,328.51 वर पोहोचला. हा आजपर्यंतचा सर्वोच्च निर्देशांक आहे. निफ्टीचा निर्देशांक 81.40 अंशाने वधारून 15,751.65 वर पोहोचला.
हेही वाचा-इजमायट्रीपकडून कोरोना लस घेणाऱ्या ग्राहकांना पॅकेजवर मिळणार सवलत
या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर-
पॉवरग्रीडचे शेअर सर्वाधिक 4 टक्क्यांपर्यत वधारले आहेत. एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इंडसइंड बँकेचे शेअर वधारले आहेत. दुसरीकडे बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी आणि डॉ. रेड्डीजचे शेअर घसरले आहेत. खासगी बँका, ऑटो आणि आयटी या कंपन्यांचे शेअर वधारले आहेत. तर धातू आणि फार्मा कंपन्यांनी नफा नोंदविला आहे.
हेही वाचा-प्राप्तिकर विभागाची ई-फायलिंग वेबसाईट होणार आज लाँच; वाचा सविस्तर माहिती
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचा परिणाम-
रिलायन्स सिक्युरिटीजचे प्रमुख रणनीतीकार विनोद मोदी म्हणाले, की देशात नवीन आढळणाऱ्या कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी झाले आहे. राज्यांनी टाळेबंदी शिथील करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अशा स्थिती शेअर बाजार निर्देशांक वधारला आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेण्ट क्रुडचे दर 0.58 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 71.47 डॉलर आहेत.