महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

बजाज ऑटोच्या वाहन विक्रीत जानेवारीत ६ टक्क्यांची वाढ

चालू वर्षात डिसेंबरमध्ये एकूण १ लाख ६४ हजार ८११ वाहनांची विक्री झाली आहे. तर गतवर्षी डिसेंबरमध्ये १ लाख ६८ हजार ७४७ वाहनांची विक्री झाली होती.

Bajaj Auto sales
बजाज ऑटो वाहन विक्री न्यूज

By

Published : Mar 1, 2021, 6:41 PM IST

Updated : Mar 2, 2021, 3:49 PM IST

नवी दिल्ली - बजाज ऑटोच्या वाहनांच्या विक्रीत फेब्रुवारीमध्ये ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चालू वर्षात फेब्रुवारीमध्ये ३ लाख ७५ हजार १७ वाहनांची विक्री झाली आहे. गतवर्षी फेब्रुवारीमध्ये ३ लाख ५४ हजार ९१३ वाहनांची विक्री झाली होती.

बजाजच्या वाहनांची विक्री डिसेंबरमध्ये २ टक्क्यांनी कमी झाली आहे. चालू वर्षात डिसेंबरमध्ये एकूण १ लाख ६४ हजार ८११ वाहनांची विक्री झाली आहे. तर गतवर्षी डिसेंबरमध्ये १ लाख ६८ हजार ७४७ वाहनांची विक्री झाली होती. ही माहिती बजाज ऑटोने शेअर बाजाराला दिली आहे.

हेही वाचा-शेअर बाजारात ७५० अंशांची तेजी; जीडीपीच्या सकारात्मक अंदाजाचा परिणाम

  • बजाजच्या दुचाकींच्या विक्रीत फेब्रुवारीमध्ये सात टक्क्यांची वाढ झाली आहे. चालू वर्षात फेब्रुवारीमध्ये ३ लाख ३२ हजार ५६३ वाहनांची विक्री झाली आहे. तर गतवर्षी फेब्रुवारीमध्ये ३ लाख १० हजार २२२ वाहनांची विक्री झाली होती.
  • व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. चालू वर्षात फेब्रुवारीमध्ये ४२ हजार ४५४ वाहनांची विक्री झाली आहे. गतवर्षी फेब्रुवारीमध्ये ४४,६९१ वाहनांची विक्री झाली होती.
  • बजाज ऑटोच्या वाहनांची निर्यात फेब्रुवारीमध्ये १३ टक्क्यांनी वाढली आहे. चालू वर्षात फेब्रुवारीमध्ये २ लाख १० हजार २०६ वाहनांची विक्री झाली आहे. गतवर्षी १ लाख ८६ हजार १६६ वाहनांची विक्री झाली होती.

हेही वाचा-घराचे स्वप्न साकारणे सुलभ; स्टेट बँकेकडून व्याजदरात कपात

दरम्यान, कोरोनाच्या काळात वाहन उद्योगाला फटका बसला होता. टाळेबंदी खुली झाल्यापासून बहुतांश कंपन्यांच्या वाहन विक्रीत वाढ होत आहे.

Last Updated : Mar 2, 2021, 3:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details