वॉशिंग्टन -अॅपलने वेगवान नवीन ५ जी वायरलेस नेटवर्कसह तंत्रज्ञानाने सज्ज चार नवीन आयफोनचे अनावरण केले. आयफोनकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आयफोन - १२ अधिक टिकाऊ असणार आहे. ६.१ इंच डिस्प्लेसह आयफोन ११ प्रमाणेच परंतु फिकट व पातळ आहे. यूएसडी ७९९ आणि आयफोन १२ मिनी ५.४ इंच डिस्प्लेसह यूएसडी ६९९. आयफोन - १२ सीरीजचे फोन काळा, पांढरा, लाल, हिरवा आणि निळ्या रंगात उपलब्ध होणार आहेत.
कंपनीचा दावा आहे की, हा जगातील सर्वात स्लीम, स्मॉल आणि फास्ट ५ जी स्मार्टफोन आहे. आयफोन १२ मिनीच्या ५.४ इंच साइजच्या व्हेरियंटला ६९९ डॉलरमध्ये लाँच करण्यात आले आहे. तर आयफोन १२ मिनीच्या ६.१ इंच साइजच्या व्हेरियंटला ७९९ डॉलरच्या किंमतीत लाँच केले आहे. iPhone 12 Pro ची किंमत भारतात ७९, ९९० रुयपांपासून सुरू होते. तर iPhone 12 Pro Max ची सुरुवातीची किंमत भारतात ११९,९०० रुपयांपासून सुरू होते. iPhone 12 Pro Max ची किंमत १२९,९०० रुपये ठेवण्यात आली आहे. अमेरिकन किंमतीच्या तुलनेत भारतात आयफोनच्या किंमती महाग ठेवण्यात आल्या आहेत.