महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

ऑगस्टमध्ये या '5' औषधी कंपन्यांचे शेअर बाजारात येणार आयपीओ, 8 हजार कोटींचा निधी जमण्याची अपेक्षा - औषधी कंपन्या आयपीओ

शेअर बाजाराच्या माहितीनुसार 12 कंपन्यांनी आयपीओमधून 27 हजार कोटी रुपये जमविले आहेत. तर 70 हजार कोटी रुपये कंपन्या जमविणार आहेत. मागील आर्थिक वर्षात केवळ 30 कंपन्यांनी आयपीओमधून 31,277 कोटी रुपये जमविले आहेत.

आयपीओ
आयपीओ

By

Published : Aug 2, 2021, 10:29 PM IST

Updated : Aug 3, 2021, 6:18 AM IST

मुंबई - आरोग्यक्षेत्रामध्ये गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड रस निर्माण झाला आहे. या स्थितीचा लाभ घेत पाच औषधी कंपन्या येत्या काही आठवड्यांमध्ये आयपीओ आणणार आहेत. या कंपन्यांना आयपीओमधून एकूण 8 हजार कोटी रुपयांचा निधी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

या औषधी कंपन्याचे आयपीओ येणार-

बेन कॅपीटलची मदत असलेले एमक्युअर फार्माचा आयपीओ हा 4 हजार कोटी रुपयांचा असणार आहे. तर विजया डायग्नोस्टिक सेंटरचा 1500 कोटी रुपये, डायग्नोस्टिक फर्म्स कृष्णा डायग्नोस्टिक 1200 कोटी रुपये आणि मुंबईमधील घाऊक औषध पुरवठादार कंपनी सुप्रिया लाईफसायन्सेसचा 1200 कोटी रुपयांचा आयपीओ असणार आहे. फार्मा फॉर्म्युलेशन्स कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट कंपनी वायडलांस बायोटेकचा 400 कोटी रुपयांचा आयपीओ असणार आहे. इन्व्हेस्टमेंट बँकरच्या माहितीनुसार पाचही कंपन्या एकत्रिपणे 8,300 कोटी रुपयांचा निधी मिळू शकणार आहे.

आयपीओ म्हणजे काय ?

पैसे जमविण्यासाठी कंपन्या आयपीओ म्हणजेच प्राथमिक समभाग विक्री (इनिशिअल पब्लिक ऑफरिंग) शेअर बाजारात आणत असतात. आयपीओच्या माध्यमातून कंपन्या गुंतवणूकदार संस्थांना तसेच सर्वसामान्य गुंतवणुकादारांना शेअर खऱेदीची संधी देतात. आयपीओ बाजारात आणण्यापूर्वी कंपन्यांना सेबीची परवानगी घ्यावी लागते. आयपीओ म्हणजे थोडक्यात शेअर बाजारात सूचिबद्ध होण्यापूर्वी कंपनीने शेअरची जाहीर केलेली किमान किंमत असते.

हेही वाचा-Zika Virus : 'झिका व्हायरस'चा प्रादुर्भाव कसा रोखाल ? सांगत आहेत डॉ. प्रदीप आवटे

गतवर्षीच्या तुलनेत यंदा आयपीओचे वाढले प्रमाण-

शेअर बाजाराच्या माहितीनुसार 12 कंपन्यांनी आयपीओमधून 27 हजार कोटी रुपये जमविले आहेत. तर 70 हजार कोटी रुपये कंपन्या जमविणार आहेत. मागील आर्थिक वर्षात केवळ 30 कंपन्यांनी आयपीओमधून 31,277 कोटी रुपये जमविले आहेत. चालू आर्थिक वर्षात 12 कंपन्यांनी आयपीओमधून 27,051 कोटी रुपये जमविले आहेत. पॉवरग्रीड इनव्हीआयटीने आयपीओमधून 7,735 कोटी रुपये जमविले आहेत.

हेही वाचा-#JeendeDo महिलावरील बलात्काराच्या घटनेनंतर 'यांनी' दिली होती वादग्रस्त प्रतिक्रिया

या ग्राहककेंद्रित कंपन्यांचे बाजारात येणार आयपीओ

देवयानी इंटरनॅशनल आणि एक्सारो टाईल्सचे 4 ऑगस्टला आयपीओ खुले होणार आहेत. ग्राहककेंद्रित सेवा देणाऱ्या पेटीएम, मोबिक्विक, पॉलिसीबाजार, कार्टाट्रेड, दाल्हीव्हेरी आणि न्याकाचे आयपीओ लवकरच खुले होणार आहेत. बाजारातील सुत्राच्या माहितीनुसार 40 कंपन्या आयपीओच्या प्रतिक्षेत आहे. या कंपन्यांना 70 हजार कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. तत्व चिंतन फार्मा, रोलेक्स रिंग्ज, जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्स, क्लिन सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी, श्याम मेटलिक्स अँड एनर्जी, इंडिया पेस्टीसाईड्स, डोडला डेअरी, ग्लेनमार्क लाईफ लायन्सेस आणि झोमॅटो या कंपन्यांना मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ई-रुपी लाँच, जाणून घ्या, डिजीटल देयकाबाबतची सविस्तर माहिती

या कारणाने औषधी कंपन्यांच्या आयपीओची वाढली मागणी-

कोरोनाच्या काळात औषधी कंपन्यांच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबई शेअर बाजारातही आरोग्य क्षेत्राचा निर्देशांक हा वधारलेला दिसून आलेला आहे. नवीन उत्पादनांचे लाँचिंग, लोकसंख्येत वृद्धांचे वाढते प्रमाण आणि जीवनपद्धतीमुळे गंभीर आजारांचे वाढलेले प्रमाण, नवीन औषधांचा शोध ही औषध उद्योग वाढण्याची कारणे असल्याचे बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे. काही कंपन्यांनी कंत्राटी उत्पादनामुळे उत्पादकता सिद्ध केली आहे. त्याचा देशातील संशोधन आणि विकास संसाधनांना फायदा झाला आहे.

वायंडलॅस कंपनी आयपीओच्या पैशांचा वापर उत्पादनासाठी करणार

वायंडलॅस बायोटेकने आघाडीच्या फायझर, सॅनोफी, कॅडिला, झायडस हेल्थकेअर, एमक्यूर फार्मा आदी कंपन्यांबरोबर करार केलेले आहेत. पहिल्यांदाच सीडीएमओ कंपनी शेअर बाजारात सूचबिद्ध होणार आहे. आयपीओमधून आलेल्या पैशांचा वापर हा कंपनीकडून डेहराडूनमधील कंपनीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी करण्यात येणार आहे. कंनपीचे उत्तराखंडमध्येही उत्पादन प्रकल्प आहेत. ग्लेनमार्क लाईफ सायन्सेसच्या आयपीओकरिता 41.17 पटीने नोंदणी झाली आहे. तर बिगर वित्तीय गुंतवणुकदारांनी 122.54 पटीने आयपीओकरिता नोंदणी केली आहे.

Last Updated : Aug 3, 2021, 6:18 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details